अनेकदा आपण, counselling sessions fail होताना किंवा अर्ध्यात सुटताना पाहतो. एक therapist म्हणून आपल्या दृष्टीने आपण आपलं सगळं knowledge, अभ्यास, अनुभव वापरून, client ला एका note पर्यंत आणतो आणि एकदम एखाद्या session ला पुन्हा सगळं मागे गेल्याचं दिसायला लागतं.
सहसा blame करायचा नाही असं आपलं कितीही धोरण आणि स्वभाव असला तरी, मनात येऊनच जातं की, कितीही आणि कसंही सांगितलं तरी शेवटी client काही ऐकत नाही, आपण दिलेला homework नियमित केला असता तर दिसला नसता का फरक, patience, self-therapy, empathy, thoughts, beliefs सगळं तर समजावलं होतं, मग का नाही पुढे काही घडलं? एक therapist कधी न कधी तरी या विचारचक्रातून जातोच. अशा वेळी therapist म्हणून फक्त self-analysis करून चालत नाही. कारण ती या प्रोफेशनची ongoing process च आहे आणि एक genuine therapist ते कायम करत असतो आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवत असतोच.
मग या प्रश्नांची उत्तरं बाहेर शोधायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं उत्तर दिसून येतं ते असं की आपण अजूनही psychology, therapy, professional help तेही मानसिक अस्वस्थतेसाठी, याची गरज आणि त्यानंतर त्याचा स्वीकार याकडे अभ्यासपूर्वक पाहिलेलंच नाहीये. मला गरज नाही या सगळ्याची, मला काय वेड लागलाय का, हे सगळं आपल्याकडंचं नाही, बाहेरच्या देशातून आलंय असे आणि यासारखे अज्ञानातून आलेले, अस्वीकाराचे संवाद खूपदा ऐकू येतात.
त्यातूनही या सगळ्यावर मात करून एखाद दुसरा येऊन बसलाच therapy साठी आणि घडू लागले त्याच्यात बदल जे इतरांना मान्य नसू शकतात तेव्हा client वेगळ्याच गोंधळातून जायला लागतो. त्याच्यासाठी एकीकडे ती व्यक्ती असते जी तसं पाहायला गेलं तर त्याची कुणीच नसते, पण तरी तिला (therapist ला) तो (client) समजलेला असतो, तिने त्याला ओळखलेलं असतं, स्वीकारलं असतं, त्याच्यापुरते त्याचे धागे सोडवायला तयार करत असते आणि दुसरीकडे client अशा माणसांमध्ये सतत वावरात असतो ज्यांचा फारसा या सगळ्यावर विश्वास नसतो, अभ्यास नसतो, त्यामुळे या सगळ्या process मधून जाताना client ला लागणार support आणि motivation पुरेसं मिळत नाही.
Client, therapist आणि गरजेनुसार जवळची माणसं एका common goal साठी काम करत असतील तर तो support उपयोगी पडू शकतो. मात्र इतरांचा सहभाग client ची संमती, गोपनीयता आणि सुरक्षितता जपूनच असायला हवा; प्रत्येक therapy मध्ये कुटुंबाचा सहभाग आवश्यक असतोच असं नाही. Client ची recovery आणि त्यासाठी लागणारा कालावधी अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. त्यात समजून घेणारं वातावरण हा एक महत्त्वाचा आधार असू शकतो.
मानसिक त्रासातून जाणारी व्यक्ती मुळातच अनेक न सुटणाऱ्या अंतर्गत प्रश्नांशी झुंजत असते. आपल्या थोड्याश्या समजुतीने, support ने आणि स्वीकाराने आपण नक्कीच त्या व्यक्तीचा थोडातरी भार हलका करू शकतो! (?)
