माणूस आज तसं पाहिलं तर पूर्वीच्या मानाने खूप aware, alert आणि स्वतःवर काम करताना दिसून येतो. म्हणजे किमान त्यादृष्टीने प्रयत्न करताना दिसतो.
मानसिक आरोग्यासाठी आपले विचार सुसंगत लागतात, शरीर निरोगी हवं, work-life balance जमला पाहिजे, मग त्यात काम, family, friend-circle, entertainment आणि ज्याला जमला त्याला "me time" ही हवा. वरवर पाहिलं तर सगळेच या बाबतीत काही ना काही करताना दिसतात. म्हणजे एकही दिवस काही न करता गेला असं आता फारसं होत नाही. Weekend ला कुठे तरी गेलंच पाहिजे हा नियम झाला आहे. (आम्ही weekend घरीच असतो असं सांगणं खूप जड जातं, it's kind of unexpected and unacceptable). बरं मिळालाच वेळ तर तो fill करायला mobile आहेच.
मग इतकं सगळं व्यवस्थित दिसत असतानाही काहींना ताण, anxiety किंवा depression सारख्या अडचणी का जाणवतात? यामागे एकच कारण नसतं. मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर अनेक जैविक, सामाजिक, मानसिक आणि जीवनशैलीशी संबंधित गोष्टी परिणाम करत असतात. Physical fitness, diet, meditation किंवा yoga उपयोगी आधार ठरू शकतात, पण त्याबरोबर गरजेनुसार व्यावसायिक मदतीचीही जागा असते.
मग अजून खोलवर जाऊन विचार केला तर असं लक्षात येतं की, सगळं नीट असलं तरी, जो तसा महत्त्वाचा भाग missing आहे तो म्हणजे, मोकळेपणाने कुठे तरी व्यक्त व्हायला, बोलायला अगदी मनातल्या साध्या गोष्टी share करायला कुणी तरी असणं. म्हणूनच अनेकदा sessions मध्ये client ला फक्त कुणीतरी आपलं ऐकून घेतलं यातच समाधान मिळतं आणि खूप ओझं असल्याच आणि ते कमी झाल्याचं जाणवतं.
कसलं असतं हे ओझं, कुठून येतं आणि का ते उतरवता येत नाही? आपल्याला बऱ्याचदा हा अनुभव येतो की आपण कुठे तरी मनातलं बोलावं म्हणून जातो, पण काही वेळा गोष्टी अशा घडतात की आपण काहीच न बोलता परत येतो. असे अनुभव लागोपाठ आले की मग आपण मदतीसाठी पोहोचणंच हळूहळू बंद करतो (मुळात मदत मागायची असते आणि ती मिळू शकते यावर विश्वासच उडालेला असतो आपला.) आणि ते सगळं साठत जातं. आपल्याला त्याचं काय करायचं कळत नसतं, समोरच्याला त्याहून त्याचा उलगडा लागत नाही, professional help घ्यायला लागणारी शक्ती अजून गोळा झालेली नसते. आतल्या आत होणारा उद्रेक बाहेर पडायची धडपड करत असतो आणि आपला सगळा वेळ त्याला शमवण्यात जात राहतो. मग अतिशय थकवा जाणवणं, लोकांपासून तुटणं, कामातून मन उठणं, स्वतःबद्दल शंका - इतरांबद्दल राग, वैताग. अशा अनेक भावना ज्या आपल्याला नको असल्या तरी यावेळी मदत(?) करत राहतात. तो आपला defence mechanism बनायला लागतो. त्याने मदत तर होत नाही पण तयार होते ती हतबलता, निराशा. आणि मग हाच आपला स्वभाव असल्यासारखे आपण जगायला लागतो. जणू हेच "आपलं new normal" आहे.
आपल्याला जाणवणारा त्रास टिकून राहतोय, रोजच्या कामांवर किंवा नात्यांवर परिणाम होतोय असं वाटल्यास मदतीची गरज असू शकते. इतरांना तो त्रास दिसेपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही. कुठल्या गोष्टीमुळे आपल्यात बदल होताहेत, कोणत्या अनुभवांनी आपण hurt होतोय, पूर्वीपेक्षा जास्त reactive झालो आहोत का किंवा लोकांपासून दुरावत आहोत का—असे प्रश्न स्वतःला विचारता येतील. हे संकेत स्वतःला दोष देण्यासाठी नाहीत, तर स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आहेत.
या सगळ्याचा विचार केला तर खूप relate करता येईल. अनेक प्रसंग आपल्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींच्या बाबतीत घडल्याचं आठवेल. त्यावेळी आपण बरं वाटावं म्हणून जे केलं त्याने बरं वाटलं का? की परिस्थिती अजून बिकट होत गेली, या सगळ्याकडे सजगपणे पाहता यायला हवं.
आयुष्य सतत बदल मागत असतं, तो बदल वेळेत करणं यालाच आपण "शहाणपण" म्हणूया? म्हणजे मग आता उशीर झाला, वेळ निघून गेली असं म्हणायला वावच नाही राहणार.
