Client, therapist कसा निवडत असेल? आणि निवड झाली तर या व्यक्तीचं ऐकावं किंवा या व्यक्तीपुढे मन मोकळं करावं असं त्याला कुठल्या क्षणापासून जाणवायला लागलं असेल? इतकी सगळी आजूबाजूची, ओळखीची, आपली माणसं सोडून एका अशा व्यक्तीच्यासमोर जाऊन आपलं मन मोकळं करावं असं ठामपणे कधी वाटलं असेल त्याला? समोर बसलेल्या या अनोळखी व्यक्तीच्या नावापुढे psychologist अशी degree आहे एवढं पुरेसं झालं असेल का?
Client, therapist ची निवड कशी करतो? काय निकष लावलेले असतात त्याने? तर, जेव्हा तो सगळे प्रयत्न करून थकलेला असतो, आता काहीच करण्याजोगं नाही उरलंय, तर शेवटचा उपाय म्हणून तो session ला येऊन पाहतो. मग काहीप्रमाणात therapist चे social media वर followers किती, आपल्याला पटेल असा काही content जर therapist च्या page वर मिळाला तर त्याला अजून boost मिळतो. जिथे social media नाही तिथे, त्यातल्यात्यात कुणी खात्रीच्या सल्लागाराने सुचवले म्हणून. खरंतर स्वतःहून therapy साठी येणाऱ्यांची संख्या खूपच निराशाजनक आहे. पण awareness वाढायला लागला आहे हे नक्की मान्य करायला हवं.
Therapist मिळाल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न client ला पडलेला असतो तो म्हणजे, तिथे जाऊन बोलायचं काय याचा. कारण therapist कडून किंवा therapy मधून मला काय मिळणार यापेक्षा मला इथे समजून घेतलं जाईल का या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात आधी अपेक्षित असतं client ला. या सुरूवातीच्या काही क्षणांपुरता तो त्याच्या समस्येपासून, प्रश्नांपासून जरासा distract झालेला असतो. इथेच संधी मिळते therapist ला client च्या मनात डोकावण्याची.
खरंतर या छोट्याशा period मध्ये therapist सुद्धा काही शंका आणि प्रश्नांमधून जात असतो. त्याचे सगळे skills एकवटून तो स्वतःची चलबिचल लपवण्याचा आणि client ची प्रत्येक हालचाल टिपण्याचा आणि वाचण्याचा प्रयत्न करत असतो, कारण या हालचालींचेही अर्थ लागणार असतात. client ला व्यक्त होण्यासाठी कितीही वेगवेगळ्या भूमिकेतून जाण्याची संधी असली तरी therapist ला अशी कुठली सूट नसते. हे सगळं जुळून येतं तेव्हा कुठे खात्री पटायला लागते की इथे व्यक्त व्हायला हरकत नाही. समोर बसलेल्या या अनोळखी व्यक्तीला, माझ्या समस्येला समजून घेण्यात interest आहे आणि यापुढे इथे जो काही संवाद घडून येईल त्याचा केंद्रबिंदू मी असणार. हे जेव्हा त्याला दिसू आणि जाणवू लागतं तेव्हा तो त्याचे घट्ट धरून ठेवलेले शब्द आणि पर्यायाने भावना मोकळ्या करायला लागतो.
इतरांनी उडवून लावले, तसे माझे प्रश्न इथेही उडवून लावले जातील का? मी जे सांगेन ते ऐकून माझ्याबद्दल काही मतं तयार केली जातील का? माझं बोलणं पूर्णपणे आणि संयमाने ऐकलं जाईल का? असे प्रश्न client directly कधीच विचारत नाही. पण हे न बोलले गेलेले प्रश्न समजून घेऊन त्याची उत्तरं client पर्यंत सहजतेने पोचवता येणं हे therapist चं खरं skill आहे. न विचारल्या गेलेल्या प्रश्नांची नकळत उत्तरं मिळाल्याने client त्याच्या शंकांपासून दूर आणि विश्वासाच्या जवळ यायला लागतो.
Client आणि therapist यांच्यातील नात्याची सगळ्यात महत्त्वाची कडी ही विश्वासाने जोडलेली असते. संभ्रम आणि आशा या दोन्ही भावना दोघे आपापल्या परीने जपत असतात आणि मग हळूहळू हे नातं dependency कडून independence पर्यंतच्या प्रवासाला सुरूवात करतं.
