Gayatri VaidyaClinical Psychologist
← Self-awareness

Self-awareness · मराठी

सोच के देखो… सोचने में क्या जाता है?

sunlight through a clear glass prism beside a plain notebook, simple authentic still life.
AI-created editorial image

विचार, भावना आणि कृती यांचा ताळमेळ आपल्या मानसिक स्वास्थ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. हा ताळमेळ बिघडल्यासारखं वाटणं हा स्वतःकडे लक्ष देण्याचा एक संकेत असू शकतो; मानसिक स्वास्थ्य मात्र अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. भावनांची पुरेशी ओळख झाली तरी त्या कृतीतून मांडायची वेळ आली की अनेकदा आपल्याला गोंधळल्यासारखं होतं. सहजपणे आपल्या भावना मांडता याव्यात म्हणून त्या भावनांशी जोडलेल्या विचारांकडेही पाहणं गरजेचं आहे.

आपण पूर्ण दिवस मनामध्ये सतत बोलत असतो. मनात चाललेली ही बडबड आपल्या भावनांवर परिणाम करत असते आणि आपल्या भावनाही विचारांवर परिणाम करतात. आपल्या विचारांमधून प्रत्येक गोष्टीकडे, situation कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तयार होत असतो. Positive राहणं म्हणजे सतत आनंदी राहणं नाही. माझ्या मनातले कठीण विचार फक्त लपवले तर आनंद वरवरचा वाटू शकतो. हेच जर मी माझे विचार समजून घेऊन त्यांच्यावर काम केलं तर भावनांकडे अधिक मोकळेपणाने पाहता येऊ शकतं.

मानसशास्त्रातील वेगवेगळ्या therapies च्या मदतीने विचारांवर काम करून हा बदल अनुभवता येऊ शकतो.

positive किंवा negative विचार यापेक्षा healthy आणि unhealthy विचार असे जर आपल्या विचारांना आपण म्हटले तर हे समजायला थोडे सोपे जाईल. कुठला विचार मला, माझे मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आहे? कुठल्या विचारांमुळे मी इतरांसाठी आणि स्वतःसाठी समस्या निर्माण करते आहे? माझ्या विचारांचा माझ्या रोजच्या कामांवर परिणाम होतोय का? अशा प्रकारचे काही प्रश्न विचारून आपण आपल्या विचारांची तपासणी करू शकतो.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इच्छा असेल तर, थोडे प्रयत्न करून आपण आपले विचार बदलू शकतो.

सोच के देखो… क्या होता है…

Gayatri Vaidya
Back to top ↑