मी negative विचार करत नाही म्हणून मी positive आहे असा अर्थ निघतो का? Positive राहणं ही प्रत्येकाची गरज आहे आणि इच्छा सुद्धा. पण फक्त positive राहणं आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण positive ठेवणं एवढं पुरेसं असतं का? एक माणूस म्हणून मी positive असणं आणि negative असणं दोन्ही अपेक्षित नाहीये का? आपण या दोन्ही गोष्टी कशा घेतो आणि समजतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
मुळात माझ्या positive असण्यामागे माझे स्वतःचे असे काही ठाम मत, विचार आहेत का, की मला दुःख आवडत नाही म्हणून मी कायम आनंदी राहण्याचा हट्ट करते/करतो. मला लोकांमध्ये गेल्यावर सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष जावं असं वाटतं का? मी Positive राहिले/राहिलो तरच मी लोकांना आवडेन असे मला वाटते का? माझ्यातील इतर कमतरता लपविण्यासाठी मला Positive राहण्याचे प्रयत्न करावे लागत आहेत का? का मला मनापासून positive राहायला आवडतं आणि जमतंही. मी सतत positive असले/असलो तरी मला इतरांच्या negative बाजूचा, भावनांचा स्वीकार करता येतो का? या सगळ्या बाजूने विचार व्हायला हवा.
Positive राहण्यासाठी काही मुद्दे लक्षात घ्यायला हवे.
मी positive असले तरी माझ्या मतांना कुणी किंमत देत नाही असे होते का? तसे होत असेल तर लक्षात घ्यायला हवे की फक्त कृती positive आहे पण त्यामागे तुमचे स्वतःचे असे काही स्पष्ट विचार नसतील तर त्या positivity ला कायमस्वरूपी स्वीकार मिळणे कठीण असते.
मी कधीतरी positive राहण्याचा प्रयत्न करते पण तसे करणे मला कठीण जाते का? मी कायम positive राहू शकते का? तसे घडत नसेल तर मनातील विचारांवर लक्ष द्यायला हवे. आपली positivity फक्त Positive राहून वाढत नाही तर ती विचारपूर्वक, सवयीत आणावी लागते आणि हळूहळू ती स्वाभाविक होत जाते.
positive राहणे हा माझ्या स्वभावाचा भाग आहे की गरजेनुसार निर्माण झालेला हट्ट आहे? याकडे प्रकर्षाने पाहायला हवे. जर तो हट्ट असेल तर मनातील कुठली तरी दाबून ठेवलेली भावना आपण त्यातून व्यक्त करत असतो. त्यावर वेळीच काम करणे आवश्यक आहे.
मला जाणवणाऱ्या negative भावना स्वीकारून त्यावर योग्य पद्धतीने काम करून मला माझी positivity टिकवता येते का? स्वतःमधील negativity चा स्वीकार आणि त्यावर काम करण्याची इच्छा यातून देखील positivity निर्माण होत असते.
Positive राहणे हे खूप नैसर्गिक असणे अपेक्षित आहे. आणि ते सरावातूनच येते. माझे विचार आणि माझे लक्ष (goal) जर स्पष्ट असेल, मी जर माझ्या विचारांशी, भावनांशी प्रामाणिक असेन तर मला जाणवणारी positivity तेवढीच सहज आणि नैसर्गिक असल्याचे मला जाणवेल आणि इतरांपर्यंत ते योग्य पद्धतीने आणि कायमस्वरूपी पोचेल. अनेकदा काही प्रसंगी आपल्याला positive राहणे अवघड जाते त्यावेळी प्रयत्न करून काही विचार develop करून आपण positivity मिळवू शकतो. कठीण प्रसंगाला सामोरे जाताना विशेषतः आपण स्वतःला कसे समजून घेतो आणि समजवतो यातून हा सराव अजून पक्का होत जातो. Positive राहण्याच्या हट्टामध्ये माझ्या मनातल्या negativity कडे माझे दुर्लक्ष तर होत नाहीये ना? हे लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे.
माझी positivity natural आहे की माझे masking आहे हा फरक वेळीच ओळखायला हवा. त्यासाठी Positive असण्यामागे तुमचा स्वतःचा विचार आणि आयुष्याचे ध्येय काय आहे हे स्पष्ट असणे आवश्यक आहे.
Let's be positive…
