Gayatri VaidyaClinical Psychologist
← Self-awareness

Self-awareness · मराठी

‘मी’ एक व्यक्ती असते

a clean mirror reflecting a sunlit houseplant and open window in a private bedroom, no face or person.
AI-created editorial image

‘मी’ एक व्यक्ती असते, स्वतंत्र विचारांची, प्रश्न-उत्तरांची, जडण-घडणीची. आपले आपले विषय आणि समजुतीने जगणारी. मग तिच्या आयुष्यात अजून विचार, समजुती, प्रश्न (उत्तरं?) येऊ लागतात ‘इतर’ व्यक्ती रूपाने. मग ‘मी’ चा एकच गोंधळ उडतो आणि मग त्याच्या समोर सगळ्यात मोठ्ठा प्रश्न उभा राहतो—‘मी’ कोण, कुठला, कसा आणि का?

नाही सापडत उत्तरं या प्रश्नांची कारण ‘मी’ राहिलेलाच नसतो, ‘मी’ कुणाचा कुणीतरी असतो, कधी ‘मी’ कुणाचा कुणीच नसतो. मग माझी जे नाही ते असण्याची आणि जे आहे ते नसण्याची धडपड सुरू होते. (इतरांमध्ये हरवलेला) ‘मी’ हाती नाही लागत.

कारण ‘मी’ ला स्वतंत्र अस्तित्व आहे आणि (मी) नेमकं तेच गमावलेलं असतं. इतरांचा कुणीतरी ‘मी’ नाही असू शकत. ‘मी’ माझाच असायला हवं, तरच मला उत्तर मिळणार असतं—‘मी’ कोण, कुठला, कसा आणि का? याचं…!

Gayatri Vaidya
Back to top ↑