Gayatri VaidyaClinical Psychologist
← Parenting

Parenting · मराठी

This is Age Appropriate… Isn’t it?

१० जून २०२१

a teenager's backpack and bicycle at a sunlit home gate, no person visible, everyday growing independence.
AI-created editorial image

मुलांमध्ये ‘स्व’ची जाणीव हळूहळू विकसित होत जाते. त्यातले काही बदल सुरूवातीच्या काळात ठळकपणे दिसतात—घरातील माणसांपलीकडच्या विश्वात पाऊल ठेवताना आणि इतर मुलांबरोबर kindergarten मध्ये जाऊ लागल्यावर. घराबाहेर शिक्षक, मित्र आणि इतर लोक भेटू लागतात. समाजात वावरण्याचे त्यांचे अनुभव वाढत जातात. ते अजूनही पालकांवर अवलंबून असतात, पण मनात बाहेरच्या विश्वाची ओढही निर्माण होऊ लागते.

पुढे Adolescence मध्ये स्व-प्रतिमा आणि स्वतःची ओळख यांना आणखी महत्त्व येऊ लागतं. सामाजिक, लैंगिक, मानसिक आणि बौद्धिक अशा विविध अंगांनी व्यक्तिमत्त्व घडत असतं. आपण स्वतंत्र व्यक्ती आहोत आणि आई-वडिलांशिवायही बाहेरचं विश्व explore करू शकतो ही जाणीव वाढू लागते. म्हणूनच मित्रांमध्ये रमणं, काही वेळ एकटं राहणं किंवा स्वतः निर्णय घेण्याची इच्छा दिसू शकते. हे बदल प्रत्येक मुलामध्ये एकसारखे किंवा एकाच वेळी घडतील असं नाही.

निर्णयांचे परिणाम समजून घेण्याची आणि आवेगांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता या काळात विकसित होत असते. काहीतरी करून पाहण्याची उत्सुकता आणि खुमारी नक्की असते. केवळ सल्ले देऊन ती पूर्ण होत नाही. त्यांच्या उत्सुकतेला भीती दाखवण्याऐवजी समजून घेणारी उत्तरं आणि योग्य मर्यादांची साथ लागते.

"मला माझ्या वयासारखं (वयाप्रमाणे) वागू द्या एवढंच म्हणणं असतं या मुलांचं."

Gayatri Vaidya
Back to top ↑