Gayatri VaidyaClinical Psychologist
← Change & Hope

Change & Hope · मराठी

खूप छान असतं कधीतरी शून्यातून उभं राहणं

fresh seedling emerging from ordinary brown soil in a small handmade pot, bright natural light.
AI-created editorial image

खूप छान असतं कधीतरी शून्यातून उभं राहणं. जुन्या आणि अतिशय घट्ट झालेल्या आपल्याच संकल्पना वापरता आल्या नाही म्हणून गंजून गेल्या होत्या, पण सोडता येत नव्हत्या आणि त्यामुळे नव्या आत्मसात होत नव्हत्या. मग एकच गोंधळ उडतो, द्विधा झालेली मनःस्थिती, आता कोसळून संपून जाईन यातून निर्माण झालेला संभ्रम आणि असहाय्यता.

बस्स झालं…! आता संपावं सगळं असं वाटतं आणि आपल्याही नकळत एक असा क्षण येतो की पुन्हा एक ऊर्जा मिळते. उभं राहण्याची, कधीतरी पाहिलेली स्वप्नं पुन्हा पडू देण्याची.

मग जाणवतं इतके दिवस अनुभवातून शिकलो त्याचा वापर होत नव्हता. काही गोष्टी आवश्यक होत्या, पण ज्या नाहीत त्याही सुटत नव्हत्या. आपलीच आपल्याला एक नवीन… पण तरीही माहीत असलेली ओळख व्हायला लागते.

“नवीन ताकद आणि जुने अनुभव असं एक अजब मिश्रण असतो आपण आता.”

नको ते मागे सुटलेलं असतं, जे हवं आहे, गरजेचं आहे त्याचा उपयोग आणि यावेळी वापरसुद्धा समजतो. कोडी सुटायला लागतात आणि त्यावेळी आतून जे जाणवतं तो “आत्मविश्वास.” जो अनुभव, चुका, अभ्यास, समजून घेणं यातून आलेला असतो. आणि ही नवी ओळख पुन्हा आपल्याला त्याच चक्रातून जायला तयार करू लागते.

Gayatri Vaidya
Back to top ↑