हर number कुछ कहता है! 😉
आज फोन update करताना… सगळ्यात आधी ठरवलं, काही नको असलेले, unnecessary numbers पहिले delete करू. A, B, C, D… हळूहळू पुढे जायला लागले. मग लक्षात आलं की आपला speed जरा मंदावला आहे… का? सरळ number पाहायचा आणि करून टाकायचा delete… नकोय न तो आपल्याला आता. नाही ना… इतकं सोपं नाहीये…! सगळे नाही पण काही numbers अडकवत होते—जुन्या आठवणी जाग्या करत होते तर काहींनी चक्क delete व्हायचं नाकारलं. नाहीच झाले delete.
वाह! म्हणजे इथेही आहेतच का गुंते. प्रत्येक विचार करायला लावणारा number एक आठवण आहे तर. म्हणजे number बरोबर त्या आठवणी जशा जाग्या होत होत्या तसे ते number delete व्हायचे सुटत होते. बरं! त्या आठवणी नुसत्या व्यक्तींच्या नव्हत्या तर ठराविक काळाच्या पण होत्या. म्हणजे अगदी transport वाल्याचा नंबर सुद्धा मला माझ्या जुन्या घरापासून निघतानाचा क्षण आठवून देत होता. माझे जुने सहकारी—त्यावेळी मिळवलेले awards, कधी काळी लावलेली library—वाचनाचं लागलेलं वेड, त्यावेळी वाचलेली प्रिया तेंडुलकरची पुस्तकं, कितीतरी नाटकं, बरंच काही होतं की.
पण नाही आता व्हा rational आणि जा समोर त्या आठवणींना आणि लावा एकदाचा सोक्षमोक्ष. ठरलं! थोडा वेळ जगायची ती आठवण आणि खुल्या मनाने करायचं tata bye bye—त्या number ला. मुळात त्या सुरेख आठवणींना आधी त्या numbers च्या कचाट्यातून सोडवायला हवं! असं खूप प्रकर्षानं आणि मनापासून वाटलं.
तसंही आकड्यांशी फार जुळत नाही माझं पण आठवणींशी खूप जमतं. आता त्यांच्यात आणि माझ्यात हे numbers नक्की येणार नव्हते! 🤗
