कुठलीही भावना feel करणं आणि ती व्यक्त करणं यातला फरक अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. कधी कधी तर reaction इतकी instant असते की आपला आपल्यालाच प्रश्नही पडतो, की आपण असे कसे वागून गेलो? मग पुढे जाऊन त्या प्रसंगाऐवजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल विचार करण्यातच आपला बराच काळ जायला लागतो.
आपल्याला त्यावेळी आलेला राग, संताप, नाराजी असेल किंवा प्रचंड रडणं, आक्रोश करणं असेल. त्याबद्दल guilt, shame, अपराधीपणा अशा भावना तयार होतात. मला त्यावेळी राग आला म्हणून, आता त्याबद्दल guilty वाटतं आहे. मी खूप विचित्र पद्धतीने माझं दुःख व्यक्त केलं, त्याची आता शरम वाटते. अशा प्रकारे आपण आपल्या feelings साठी काहीतरी feel करत राहतो "यालाच meta emotion म्हणतात, म्हणजे an emotion you feel about your own emotion".
का होतं असं? मला माझ्या योग्य भावना आणि प्रसंगाला धरून व्यक्त होणं त्याचवेळी जमलं असतं तर मी या spiral मध्ये अडकले असते का? तर इथे एक लक्षात घ्यायला हवं, की दुःखद घटना घडली की दुःख वाटणं साहजिक आहे, राग येणारी गोष्ट घडली तर राग आलाही पाहिजे. पण त्याबद्दल असणारी जागरूकता आणि समज ही खूप महत्त्वाची आहे. माझ्या कामाच्या ठिकाणी काहीतरी घडलं तिथे मला react करता (होता) आलं नाही, त्याचा राग मी घरच्यांवर काढत तर नाहीये, आज माझ्या मनासारखी एखादी गोष्ट नाही घडली, म्हणून त्याची नाराजी मी सगळ्यांवर काढत तर नाहीये? याचा विचार असणं आणि त्यानुसार स्वतःला train करणं याला emotional management म्हणतात.
Emotional management म्हणजे भावनेचं suppression नाही. मी कसं माझं दुःख लपवते/लपवतो किंवा राग फक्त दाबून ठेवते/ठेवतो यापुरतं ते मर्यादित नाही. दाबून ठेवलेल्या भावना काही वेळा इतर मार्गांनी व्यक्त होऊ शकतात. भावना समजून घेणं आणि त्या योग्य वेळी, योग्य पद्धतीने व्यक्त करता येणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. भावनेचा प्रत्येक उद्रेक हा दमनामुळेच होतो असं नाही. पण ‘मी पुरुष आहे तर रडणार कसा’, ‘मी लहान आहे तर मोठ्यांना कसं बोलणार’ किंवा ‘मला व्यक्त व्हायला जागाच नव्हती’ अशा कारणांनी आपण भावना वारंवार दाबत तर नाही ना, हे पाहता येईल. स्वतःला किंवा इतरांना दोष देण्यापेक्षा हा अनुभव समजून घेणं अधिक उपयोगी ठरू शकतं.
आपल्याला आपली भावनाच समजली नाही, मी काय feel करते त्याला काय म्हणावं हेच नाही समजलं तर निश्चितच आपल्या प्रतिक्रिया चुकणार आहेत आणि त्या भावनेचं दमन देखील होणार आहे. खरंतर मी एखाद्या प्रसंगाच्या वेळी जे व्यक्त झाले ती माझी भावना होती का? जे खरोखर जाणवलं होतं ते व्यक्त झालं का? हे समजण्यासाठी आपल्याला आधी आपल्या भावना ओळखता यायला हव्या, त्यांना योग्य नाव (label) दिलं की आपली प्रतिक्रिया बदलते हे लक्षात येईल. म्हणजे मला एखाद्या गोष्टीचा अतिशय राग येतोय, की irritation होतंय? ज्यावेळी आपण, आपल्याला जे वाटतं आहे त्याला योग्य नाव (label) देतो त्यावेळी त्याची तीव्रता लक्षात येते आणि त्यानुसार आपण प्रतिक्रिया द्यायला लागतो. अतिशय रागातून आलेली reaction आणि irritation मधून आलेली reaction यात किती फरक असू शकतो, हे तुम्ही समजूच शकता.
म्हणूनच जे वाटतंय ते काय आहे, त्याला काय नाव (label) देता येईल, याचा अभ्यास करून जर आपण प्रतिक्रिया द्यायला लागलो तर अनुभवता येईल, किती मोकळं आणि शांत वाटतं ते. विचारांचा गुंता सुटायला लागतो. बोलण्यात, वागण्यात नेमकेपणा यायला लागतो, जिथे जे वाटायला हवं, तेच वाटायला लागतं, जसं व्यक्त व्हायला हवं, तसं होताही येतं. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची आहे ती emotional literacy, जी emotional management चा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नेमके अर्थ आणि योग्य नाव (label) जर आपण आपल्या भावनांना देऊ शकलो तर अनेक गोष्टी सुखकर आणि स्पष्ट व्हायला मदतच होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली emotional management ही प्रामुख्याने आपली जबाबदारी आहे - इतरांची नाही!
