“खूप भांडलो का रे आपण?”
“हो, भांडलो खरे!”
“भांडल्यावर त्रास होतो?”
“भांडल्यावर सल कळते.”
“भांडण दूर नेतं!”
“भांडण अंतर कमी पण करतं!”
“म्हणजे अंतर होतं तर, आपल्यात?”
“अर्थात! म्हणूनच तर भांडत होतो!”
“मग आता काय आहे? अंतर की अजून काही?”
“आता खात्री आहे!”
“कसली?”
“दूर असलो तरी, अंतर नसण्याची!”
“याला काय म्हणावं मग?”
“काहीच नको, नाव दिल्याने गोंधळ होतो.”
“आपला झाला तसा?”
Typing…
Hmm…
